Last Updated: Monday, May 7, 2012, 16:47
www.24taas.com, धुळे 
धुळ्यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मानापमान नाट्य रंगले. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.
त्यांनी एकमेकांवर खुर्च्यां फेकल्या. कार्यक्रमात पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना डावलल्यानं काँग्रेसमधून संताप व्यक्त होत होता. वैद्यकिय महाविद्यालयाचे उद्घाटन सोहळ्यालाच हा राडा झाल्याने आघाडीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांच्या सांगण्यावरुनच शेट्टी यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते बिथरले आणि राड्याला सुरवात झाली.
First Published: Monday, May 7, 2012, 16:47