भर दिवसा ATM मशीनची तोडफोड - Marathi News 24taas.com

भर दिवसा ATM मशीनची तोडफोड

www.24taas.com, नाशिक
 
नाशिकमध्ये भर दुपारी स्टेट बँकेच्या एटीएम मशीनची तोडफोडीची घटना घडलीय. सिडको परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएम सेन्टरमध्ये ही घटना घडली आहे. मनीष पुरषोत्तम बोरस्कर हा वेट लिफ्टिंगच्या प्लेट घेवून आला. आणि त्यानं बँकेच्या आवारातीलचं एटीएम मशीनची तोडफोड केली.
 
यात दोन्ही मशीनचा चक्काचूर  झालाय. मनीषचं त्याच बँकेत खातं आहे. त्याच्या खात्यावर पैसे येणार होते. मात्र ते आले नाहीत म्हणून संतापाच्या भरात तोडफोड केल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. त्याचा आरडाओरडा आणि आवेश बघून परिसरातील नागरिकानी घाबरून पळ काढला. तसंच मनोरुग्ण म्हणून अंबड पोलिसांच्या ताब्यात दिलं.
 
मात्र  पोलिसांनी त्याच्यावर चोरीचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केलाय. मात्र दोन सुरक्षारक्षक असून देखील आरोपीनं एटीएमची तोडफोड केल्यानं एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

First Published: Tuesday, May 8, 2012, 19:55


comments powered by Disqus