नाशिक, नगरमध्ये अवकाळी पाऊस - Marathi News 24taas.com

नाशिक, नगरमध्ये अवकाळी पाऊस


www.24taas.com, नाशिक

 
 
नाशिक जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. येवला,मनमाड, नानाद्गाव आणि सिन्नर भागातील अनेक गावांमध्ये आज विजेच्या कडकडटासह पावसानं अर्धा तास वाहतूक जाम केली.
 
 
वणीमध्ये झाड कोसळून एका मुलाचा मृत्यू झालाय. तर नाशिकमध्ये दुपारी प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या. येवला तालुक्यात पाटोदा येथे घराचे पत्रे पडून महिला जखमी झाली. तसेच धानोरे येथे झाड पडून म्हैस दगावली. तसेच काही ठिकाणी शाळेवरची पत्रेही उडाले आणि मनोराही कोसळला. तर नाशिक पुणे रस्त्यावर येवल्यात एक घर कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला शिर्डीला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
 
 
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळच्या अकोले तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. निफाड तालुक्यात मजुरांच्या झोपड्या उडाल्या. तसेच बाजारपेठेतील हजारो क्विंटल कांदा भिजला. चांदवड तालुक्यात  शेतामधील धान्य व कांद्याचे शेड उडून शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तर पुण्यात  मंचर, शिक्रापूरसह नारायणगाव तसेच शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, केंदूर परिसरात जोरदार पाऊस झाला.
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 10:00


comments powered by Disqus