Last Updated: Thursday, May 10, 2012, 13:01
www.24taas.com, नाशिक 
नाशिकमधल्या तनिष्क ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीप्रकरणी केवळ 24 तासांत दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. एका बंटी-बबलीच्या जोडीनं ही चोरी केल्याचं उघड झालंय.
मंगळवारी मध्यरात्री महात्मानगर परिसरातल्या तनिष्कच्या शोरूममधून 30 ते 40 तोळे सोन्याची चोरी झाली होती. दुकान मागच्या बाजूनं फोडून चोरटे सोनं घेऊन फरार झाले होते. दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमे-यात हे चोरटे कैद झाले होते.
नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्यानं नागरिकांची डोकेदुखी वाढलीय. यापूर्वी सटाणा तालुक्यात आमदाराच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हान दिलं होतं. मात्र तनिष्क चोरीप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना तत्काळ अटक केल्यानं नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय. चोरट्यांच्या अटकेमुळे इतरही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त होतीय.
First Published: Thursday, May 10, 2012, 13:01