Last Updated: Wednesday, November 30, 2011, 02:42
झी २४ तास वेब टीम, नाशिक नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय. विशेष म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोरच हा प्रकार घडला.
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे कार्यकर्ते निवडणुकीत एकत्र कसे राहतील, हा प्रश्नच उपस्थित होतोय. डोळ्यासमोरच भांडण झाल्यानं थोरातांची अवस्था विचित्र झाली. राजकीय वैमनस्यातून अशी भांडणं होतात अशी सारवासारव थोरात यांनी केली.
First Published: Wednesday, November 30, 2011, 02:42