उन्नावमध्ये नाही जळगावात खोदकामात सापडला खजिना! treasures found in Jalgaon!

उन्नावमध्ये नाही जळगावात खोदकामात सापडला खजिना!

उन्नावमध्ये नाही जळगावात खोदकामात सापडला खजिना!
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

जळगाव शहराच्या रथ चौक भागात खोदकाम करताना खजिना सापडलाय. सदाशिव वाणी यांच्या घराचं खोदकाम करत असताना १८४० ते १८९५ या काळातील एका मातीच्या मडक्यात ६१ नाणी सापडलीत.

या नाण्यांवर ती कोणत्या वर्षी चलनात आणली याचा उलेख आहे. खोदकाम करताना जळगावात मोठा खजिना सापडला, ही माहिती मिळताच तो पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

प्रशासनानं हस्तक्षेप करून महसूल विभागानं नाणी ताब्यात घेतली आहेत. पुरातत्व विभागालाही याबाबत कळवण्यात आले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 19, 2013, 17:13


comments powered by Disqus