रोड रोमिओला मिळालं `व्हेलेंटाईन गिफ्ट`..., valentine gift to a road romeo in dhule

रोड रोमिओला मिळालं `व्हेलेंटाईन गिफ्ट`...

रोड रोमिओला मिळालं `व्हेलेंटाईन गिफ्ट`...


www.24taas.com, झी मीडिया, धुळे

`व्हेलेटाईन डे`च्या दिवशी एका रोडरोमिओला चांगलंच गिफ्ट मिळालंय. मुलींची छेड काढणाऱ्या या रोड रोमिओला जमावानं चांगलाच चोप दिलाय.

हा रोड रोमिओ एक सरकारी अधिकारी आहे. एका मुलीचा मोबाईल नंबर मागण्यासाठी तिच्या मागे मागे हा रोड रोमिओ चक्क एका शाळेत घुसला होता. या वेळी काही मुलींनी तक्रार केल्यानंतर संतप्त जमावानं या रोडरोमिओला व्हेलेंटाईन डे निमित्तानं चांगलंच गिफ्ट दिलं. यथेच्छ चोप दिल्यानंतर त्याला जमावानं पोलिसांच्या ताब्यात दिलं.

मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुलींची छेड काढणाऱ्या कर्मचाऱ्याला वाचवण्याचा पराक्रम पोलिसांनी केला. या रोड रोमिओविरोधात कुठलीही प्रतीबंधात्त्मक कारवाई पोलिसांनी केली नाही.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 14, 2014, 19:55


comments powered by Disqus