नाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ, Vehicle set on fire in Nashik

नाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ

नाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ
www.24taas.com,नाशिक

नाशिकमध्ये वाहन जाळपोळीचं सत्र सुरुच आहे. नाशिकमध्ये तीन बाईक आणि दोन सायकल्स जाळण्यात आल्यात. पंचवटी भागातल्या तारांगण सोसायटीत ही धक्कादायक घटना घडलीय.

जाळपोळीचं सत्र असताना काही गाड्यांचं पेट्रोल चोरण्याचाही प्रयत्न काही समाजकंटकांनी केलाय. पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास या बाईक जाळण्यात आल्याचं सांगण्यात येतयं. ज्यावेळी तारांगण इमारतीतल्या रहिवाशांना पहाटेच्या सुमारास जळण्याचा वास आला. त्यावेळी त्यांनी इमारतीखाली पाहिले असता त्यांच्या बाईक जळत होत्या.



या प्रकरणी पंचवटी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. माहिती देऊनही पंचवटी पोलीस घटनास्थळी आले नाही. उलट पोलिसांनीच नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून तक्रार दाखल करायला लावली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामाही केला नाही. पोलिसांच्या या भूमिकेमुळं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

First Published: Thursday, January 31, 2013, 17:05


comments powered by Disqus