जळगावात राज कुणाला करणार टार्गेट? Who will be Raj`s target in Jalgaon?

जळगावात राज कुणाला करणार टार्गेट?

जळगावात राज कुणाला करणार टार्गेट?
www.24taas.com, जळगाव

कोल्हापूर, खेड, सोलापूर, जालना, अमरावतीमध्ये सभा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्रात 7 एप्रिलला आपली सभा घेणार आहेत. त्यात यावेळी ते कुणाला टार्गेट करणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे.

जळगावमधल्या राजकारणावर दबदबा असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन तसंच त्यांचे समर्थक सध्या जळगाव महापालिकेतल्या 29 कोटी 59 लाखांच्या घरकूल घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहे. त्यातच येत्या सहा महिन्यात जळगाव महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे जैनांची महापालिकेतली एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी अनेक पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. नेमकी हीच संधी आता मनसेनं हेरली आहे. येत्या 7 एप्रिलला राज ठाकरेंची जळगावात सभा होत आहे.



आपल्या सभेत राज ठाकरे जैन यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर तोंडसुख घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज ठाकरे जळगाव दौ-यात काय बोलतात आणि कुणाला टार्गेट करतात याकडेच सा-यांच लक्ष आहे.

First Published: Thursday, April 4, 2013, 19:06


comments powered by Disqus