Last Updated: Sunday, October 6, 2013, 18:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन अध्यक्षपदी नाट्यलेखक आणि ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांची निवड करण्यात आलीय. काकडे यांच्या व्यतिरिक्त सांगलीच्या तारा भवाळकर, पुण्याच्या किर्ती शिलेदार आणि नागपूरचे मदन गडकरी यांची नावं अध्यक्षपदासाठी समोर आली होती.
गेल्या ३ ते ४ वर्षांप्रमाणेच यावर्षीही निवड बिनविरोध व्हावी असा प्रयत्न होता. त्यानुसार यावर्षीही काकडे यांची बिनविरोध निवड झालीय. अखिल भारतीय नाट्य परिषदेची आज मुंबईत बैठक झाली. यात अध्यक्षपदासाठी अरुण काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे हे आविष्कार नाट्य संमेलनाचे आधारस्तंभ आहेत. काकडे यांना त्यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार आजवर प्रदान करण्यात आले आहेत. गेली ६१ वर्षे ते प्रायोगिक रंगभूमीशी असलेलं आपलं नातं टिकवून आहेत आणि याच सर्वकष कामगिरीबद्दल मागील वर्षी त्यांचा संगीत नाटक अकादमीनं गौरव केला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 6, 2013, 18:24