९०टक्के बोगस मतदान मोहन जोशी पॅनलला, Bogus voting, All India Marathi Natyprishad,

९०टक्के बोगस मतदान मोहन जोशी पॅनलला

९०टक्के बोगस मतदान मोहन जोशी पॅनलला
www.24taas.com, मुंबई

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या बोगस मतदानातील सुमारे ९०टक्के मते मोहन जोशी पॅनलच्या उमेदवारांच्या पारड्यात पडलीयेत. ही धक्कादायक माहिती पोलीस सुत्रांकडून आलीये.

एकूण १९९९ बोगस मतांपैकी जोशी पॅनलच्या उमेदवारांना सरासरी १७८०मते पडली आहेत. तर, जोशी यांच्या विरोधातील पॅनलच्या उमेदवारांमध्ये अशोक हांडे, सुधीर भट, अरुण नलावडे यांच्यासह काही अपवाद वगळता कुणालाही १००मतांचा आकडा गाठता आला नाही.

नाट्यपरिषदेच्या मुंबई विभागातील पात्र मतदारांची संख्या ५९२६ असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त मतदान झाले होते. हा बोगस मतदानाचा प्रकार सिद्ध झाल्यानंतर निवडणूक अधिका-यांनी मुंबई विभागातील मतदान प्रक्रियाच सुरुवातीला रद्द ठरवली होती. त्यानंतर नाट्य परिषदेच्या घटनेनंतर मुंबई विभागातील अधिकृत मतांची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिला असून २६ तारखेला त्याची मोजणी होणार आहे.

दरम्यान, या सर्व प्रकाराच्या मूळाशी जाऊन पोलीस चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नटराज पॅनलचे विनय आपटे यांनी झी २४ तासशी बोलताना केली.

First Published: Sunday, February 24, 2013, 09:10


comments powered by Disqus