नाट्य परिषदेत `सीआयडी`चा प्रयोग CID inquiry in Natya Parishad

नाट्य परिषदेत `सीआयडी`चा प्रयोग

नाट्य परिषदेत `सीआयडी`चा प्रयोग
www.24taas.com, मुंबई

अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीतल्या बोगस मतपत्रिका प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी पुढे आली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात आपलं पॅनल उतरवणारे ज्येष्ठ रंगकर्मी विनय आपटे यांनी ही मागणी केली.

याबाबत लवकरच गृहमंत्र्यांना पत्र पाठवण्यात असल्याचं विनय आपटे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता गाजलेल्या नाट्य परिषद निवडणुकीच्या नाटकात सीआयडीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीनं नाट्यसृष्टीतील एक काळी बाजू समोर आली आहे.


सीबीआय चौकशीची मागणी मान्य झाल्यास या प्रकरणातला खरा `घाशीराम` कोण, हे बाहेर येण्यास मदत होणार आहे. नाट्यसृष्टीचा `सूर्यास्त` ही `सूर्याची पिल्लंच` करतील की काय, अशी भीती आता व्यक्त होत आहे.

First Published: Sunday, February 24, 2013, 23:21


comments powered by Disqus