डॉ. मोहन आगाशे ९३व्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष

डॉ. मोहन आगाशे मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष

डॉ. मोहन आगाशे मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष
www.24taas.com, पुणे

९३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर मोहन आगाशे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

डॉक्टर मोहन आगाशे जेष्ठ्य अभिनेते आहेत. अनेक दर्जेदार मालिका, सिनेमांबरोबरच गेली पाच दशकं ते रंगभूमीवरही कार्यरत आहेत आणि आपल्या सहज, सुंदर अभिनय़ाने त्यांनी अनेक भूमिका जिवंत केल्या आहेत. अनेक हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

डॉ. आगाशे हे प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञही असून त्यांची आरोग्य विषयक मोहिमेमध्ये १९९८ साली महाराष्ट्र सरकारच्या सल्लागारपदी निवडही झाली होती. अभिनेय क्षेत्रात डॉ. मोहन आगाशेंना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १९९६ साली `संगीत नाटक अकादमी`चाही पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. एप्रिल १९९७ ते एप्रल २००२ पर्यंत त्यांनी `फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं` संचलकपदही भूषवलं होतं. घाशिराम कोतवाल नाटकातील त्यांची नाना फडणवीसांची भूमिका विशेष गाजली होती. सध्या रंगभूमीवर त्यांचं काटकोन त्रिकोण हे नाटक गर्दी खेचत आहे.

First Published: Monday, October 15, 2012, 17:43


comments powered by Disqus