‘नटसम्राटाला’ गिनीज बुकात मिळणार घर?, natsamrat marathi drama in guinness world record

‘नटसम्राटाला’ गिनीज बुकात मिळणार घर?

‘नटसम्राटाला’ गिनीज बुकात मिळणार घर?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘कुणी घर देता का घर?’ अशी सार्त हाक घालणाऱ्या नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांना ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये घर मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.

‘नटसम्राट’ या नाटकाचे सलग आठ प्रयोग करण्याचा पराक्रम करण्यात आलाय. सलग ३१ तास ४५ मिनिटं हे प्रयोग सुरू होते. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून हे प्रयोग सुरू झाले. ते दुसऱ्या दिवशी दीड वाजता आठही प्रयोग पूर्ण झाले. शेवटच्या प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागूही हजर होते. नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली होती. सध्या हीच भूमिका अभिनेता आणि दिग्दर्शक गिरीश देशपांडे निभावत आहेत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये याची नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज लिखित `नटसम्राट` या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेनं २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी मुंबईतल्या बिर्ला मातोश्री सभागृहात सादर केला होता. हेच नाटक आजतागत प्रेक्षकांची गर्दी खेचून घेण्यात यशस्वी ठरलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 16:39


comments powered by Disqus