नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा वाद पोलीस स्टेशनात!, natya parishad at police station

नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा वाद पोलीस स्टेशनात!

नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा वाद पोलीस स्टेशनात!
www.24taas.com, मुंबई

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वाद पोलिसात गेलाय. विनय आपटेंनी यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांची भेट घेतलीय. नाट्य परिषद निवडणुकीतील मतपत्रिका घोळा संदर्भात माहिती देण्यासाठी विनय आपटे यांनी ही भेट घेतली.

गेल्या अनेक दिवसांपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा मुद्दा गाजतोय. शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेली आणि नाट्यसृष्टीतील प्रत्येक नाट्यकर्मीची ही मातृसंस्था... ही संस्था यापुढल्या काळात कोणाच्या ताब्यात असेल त्याचा निर्णय करणारी ही निवडणूक... मोहन जोशी यांचं उत्स्फूर्त पॅनल आणि विनय आपटेंचं नटराज पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. दोन्ही बाजूंकडून एकमेंकाडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. इतकंच नाही तर मतपत्रिका पळवण्याचा आरोपही होतोय. राज्यात ठिकठिकाणी मतपत्रिका पोहचल्याच नसल्याचे आरोप विनय आपटे आणि मोहन जोशी पॅनलकडून होतायत.

याच संदर्भात माहिती देण्यासाठी विनय आपटेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडल्याचं सांगितलं जातंय.

First Published: Friday, February 8, 2013, 10:45


comments powered by Disqus