रंगसंगती... कलेशी आपुलकी असणारे कलाकार, Rangasangti Kirti college student

रंगसंगती... कलेशी आपुलकी असणारे कलाकार

रंगसंगती... कलेशी आपुलकी असणारे कलाकार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या आणि कलेशी आपुलकी असलेल्या सर्व तरुणांना संघटीत करून कीर्ती महाविद्यालयाच्या आजी - माजी विद्यार्थ्यांनी रंगभूमीचा आणि कला क्षेत्राचा वारसा अविरत चालू ठेवण्याच्या एकमेव उद्देशाने `रंगसंगती’ कलामंच या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेने सादर केलेल्या एकांकिका ,पथनाट्य, लघुपट नेहमीच गाजत आले आहेत. संस्थेतील सर्व मंडळीनी उत्तोमोत्तम कामगिरी करून मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तसेच गोव्यात सुद्धा आपला प्रेक्षक वर्ग कमवला आहे. याच निमित्ताने रंगसंगती कलामंच आपला ३ रा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदा संस्थेने ` एकुट समूह ` हि बहारदार एकांकिका तसेच ` फेस-भूक ` आणि ` हाय-हाय ` अश्या अफलातून स्कीट्स सादर करून अनेक बक्षीसे मिळवत महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. संस्थेतील मुलांचे आणि संस्थेचे काम व मेहनत बघता बऱ्याच दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी संस्थेतील मुलांना नाटक, सिरिअल आणि सिनेमा या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध करून दिली. तसेच ` MAMI ` आंतर राष्ट्रीय चित्रपट मोहत्सव व ` 3rd Eye ` आशियायी चित्रपट महोत्सव या सारखे आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच ज्ञानमयी करीअर फ़ेअर , MDACS , MSACS अशा सामाजिक बांधिलकी असलेल्या कार्यात रंगसंगतीचा मोलाचा वाटा आहे.

भवितव्यात संस्थेतर्फे मुलांना विविध कला क्षेत्रात यश प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून पुढील वाटचालीची योजना आखण्यात येते. संस्थ्येचा वर्धापन दिन सोहळा हा त्यातीलच एक भाग. यंदा रंगसंगती कलामंच आपला तिसरा वर्धापन दिन सोहळा साजरा करणार असून या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही एक सामाजिक कार्य करणार आहे यंदा कार्यक्रमा दरम्यान प्रेक्षकांकडून त्यांच्या स्वइच्छेनुसार दिला जाणारा निधी रंगसंगती संस्था दुष्काळग्रस्त भागातील लोकांपर्यंत पोहचवणार आहे. २३ मे २०१३ रोजी संध्याकाळी ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे पार पडणाऱ्या या सोहळ्यात संस्थे तर्फे नृत्य , एकांकिका , स्कीटच सदरीकरण तसेच संस्थेतील मुलांनी दिग्दर्शित केलेल्या निवडक शॉर्ट फिल्म दाखविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला सिने-नाट्य सृष्टीतले सुप्रसिध्द कलाकारांची उपस्थिती असणार आहे. संस्थेने हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवला असून प्रथम येणाऱ्यास प्राधन्य दिले जाईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 10:56


comments powered by Disqus