Last Updated: Sunday, January 13, 2013, 12:40
www.24taas.com, मुंबईकौशिक निर्मित विजय केंकरे दिग्दर्शित ‘दुर्गाबाई जरा जपून’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय...अशोक पाटोळे लिखित या नाटकातून स्मिता तळवलकर यांनी ब-याच वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलंय... विनोद, रहस्य आणि संदेश या तिघांचा मेळ घालत रंगमंचावर सादर होतंय ते अशोक पोटोळे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित दुर्गाबाई जरा जपून हे नाटक
हल्ली समाजात वृध्दांच्या हत्येच्या समस्येने उग्र रुप धारण केलंय...काही कारणामुळे एकट्याने जगावं लागणारं वयोवृधादांचं आयुष्य आणि त्यात जाणवणारी असुरक्षिततेची भिती हाच विषय रहस्यमयतेचं कथानक घेऊन मिश्किल शैलीत मांडण्यात आलाय....
या नाटकातल्या वयोवृध्द महिलेची अर्थात दुर्गाबाईंची प्रमुख भूमिका साकारत स्मिता तळवलकर यांनी रंगभूमीवर ब-याच वर्षांनी पुनरागमन केलंय...तर या नाटकाच्या माध्यमातून स्मिता तळवलकर आणि सतीश पुळेकर यांची अनोखी जोडी पहिल्यांदाच जुळून आलीय...स्मिता तळवलकर आणि सतीश पुळेकर य़ांच्या अभिनयला उत्तम साथ दिलीय ती रुबाबदार पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारणा-या सुदेश म्हशीलकर यांनी...
एकुणच सामाजिक समस्येचं नेमकं भाष्य करत हसत खेळत हे नाटक रंगतं...आणि सरते शेवटी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी काहीतरी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करतं...
First Published: Sunday, January 13, 2013, 12:40