Last Updated: Friday, June 15, 2012, 23:29
www.24taas.com, मुग्धा देशमुख, मुंबई 
कल्पित निर्मित बायको असून शेजारी हे नाटक दहा वर्षांनंतर रंगभूमीवर दाखल होतं आहे. प्रदीप पटवर्धन आणि जयवंत वाडकर यांचे संवाद म्हणजे या नाटकातली खरी मजा... या नाटकातूनच ही जोडी एकत्र दिसली होती...मात्र या नाटकात आता सुप्रिया पाठारे दिसणार आहे. तर त्यासाठी आश्चर्य वाटायला नको..
सुप्रिया पाठारे आणि या नाटकात? मात्र त्याच असं आहे की बायको असून शेजारी हे नाटक तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर येतं आहे. त्यामुळेच आता नव्या दमाच्या टीमसह हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. त्यामुळे या नाटकाच्या रिहर्सलमध्ये आता सुप्रियाही व्यग्र आहे.... या नाटकात घटस्फोटीत नवरा-बायकोला एकत्र आणण्याचं काम करतोय सुशांत रिसबूड.
आत्ता कुठे या नाटकाची तामिल सुरू झाली आहे मात्र या कलावंतांना प्रतीक्षा आहे ती रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्यांची. हा मात्र रंगभूमीवरचा पडदा उघडेपर्यंत या कलावंतांना रिहर्सल सुरू ठेवावी लागणार हे नक्की.
First Published: Friday, June 15, 2012, 23:29