'नवा गडी...'ची १२५ राज्यं - Marathi News 24taas.com

'नवा गडी...'ची १२५ राज्यं

www.24taas.com, मुंबई 
 
‘नवा गडी नवं राज्य’...रंगभूमीवर अवतरलं आणि पुरस्कारांच्या वर्षावातच या नाटकाने  125 प्रयोगाचा टप्पा कधी गाठला कळलंच नाही आणि म्हणूनच या नाटाकाने खास हटके पध्दतीचं सेलिब्रेशन केलं.
 
नव विवाहीत जोडप्याप्रमाणेच ऋषिकेश आणि अमृताचा संसार हसत खेळत गुण्यागोविंदाने सुरु होता. मात्र अमृताच्या मित्राची अर्थात हिंमतरावची एन्ट्री होते आणि अमृता-हिंमतरावमधलं मोकळं वागणं ऋषिच्या मनात संशयाची ठिणगी पेरून जातं.नाटकातला हाच टर्निंग पाईंट नाटाकाच्या कथानकाला ख-या अर्थाने पुढे नेतो. अखेर ऋषि आणि अमृताच्या संसाराचा प्रश्न घटस्फोटापर्यंत जातो.
 
आजच्या तरुणाईचं चित्रण करताना, त्यांच्या विचारांशी मिळतजुळतं घेताना, नात्यांच्या त्रिकोणातल्या गैरसमजांमुळे उभं राहणारं हे नाटक अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलंय.नुकताच या नाटकाने 125 प्रयोगांचा टप्पा गाठला.
 
125 प्रयोगाचं सेलिब्रेशन हटके पध्दतीने व्हावं म्हणून उमेश-प्रिया जोडीने चक्क सेलिब्रिटी कपल्सना आमंत्रित केलं आणि त्यांचा सन्मान करत नाटकातल्या कलाकारांचा गौरवही केला.  यावेळी नाटकाला हिंदीमधील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेही उपस्थित होता. इतकंच नाही तर हे नाटक पाहिल्यानंतर आपलं काही खरं नाही असं सांगायलाही श्रेयस विसरला नाही....
 
 
एकुणच मजामस्ती करत झालेलं 125 प्रयोगाचं सेलिब्रेशन ‘नवा गडी, नवं राज्य’ नाटकाच्या टीमला एक वेगळाच हुरुप देऊन गेलं असणार यात शंकाच नाही...

First Published: Sunday, July 15, 2012, 17:19


comments powered by Disqus