शिवाजी पार्कवर अवतरली 'शिवशाही' - Marathi News 24taas.com

शिवाजी पार्कवर अवतरली 'शिवशाही'

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिग्दर्शित 'जाणता राजा' हे महानाट्य पुन्हा एकदा बघण्याची संधी मुंबईकरांना मिळालीय.२० ते २५ डिसेंबरदरम्यान या महानाट्याचं आयोजन शिवाजी पार्कमध्ये करण्यात आलंय.
 
दोनशे पन्नास कलाकार, हत्ती, घोडे, आणि सात मजली भव्य फिरता रंगमंच असा भव्य दिव्य देखावा बऱ्याच दिवसांनी पहायला मिळाला तो मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये. कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिग्दर्शित केलेलं ‘जाणता राजा’ हे महानाट्य पुन्हा एकदा नव्या दिमाखात उभं राहिलंय. या महानाट्याच्या शुभारंभाचा प्रयोग नुकताच शिवाजी पार्कमध्ये पार पडला. शिवरायांचा जन्म सोहळा, हिंदवी साम्राज्यासाठी जिजाऊंची तळमळ, आक्रमणावेळीची लढाईची दृश्य अशा एक ना अनेक प्रसंगांमुळे प्रेक्षकही भारावून जातात. पुन्हा एकदा हे महानाट्य सादर करण्याची संधी मिळाल्याने कलाकारही आंनदात आहेत.
 
२० ते २५ डिसेंबरपर्यंत हे महानाट्य जवळून पहायची संधी प्रेक्षकांना मिळतेय. विशेष म्हणजे 2006 सालानंतर पहिल्यांदाच या महानाट्याचा प्रयोग शिवाजी पार्कवर पार पडत असल्यमुळे शिवप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी चालून आलीय असं म्हणायला हरकत नाही.
 

 
 

First Published: Thursday, December 22, 2011, 08:14


comments powered by Disqus