...आणि थिएटर फुटलं! - Marathi News 24taas.com

...आणि थिएटर फुटलं!

Tag:  
परवा लव्हबर्ड्स या नाटकाचा प्रयोग ठाण्यातल्या गडकरी रंगायतनला सुरू होता. प्रयोग सुरू होण्यापूर्वी रीतसर अनाउन्समेण्ट झाली. 'नाट्यप्रयोगादरम्यान






 

मोबाइल वाजला, तर प्रयोग आहे तिथे थांबवला जाईल. रसिकांचा रसभंग झाल्यास त्याला तो प्रेक्षक जबाबदार असेल.' पुढे नीट प्रयोग सुरू झाला आणि प्रयोग ऐन रंगात आला. अनिकेत विश्वासराव आणि अमृता सुभाष हे नाटकात जाम सेण्टी झाले होते आणि अचानक मोबाइल वाजला. जाहीर केल्यानुसार दोघांनीही प्रयोग थांबवला. त्या प्रेक्षकाने घाईघाईत फोन बंद केला. प्रयोगाला पुन्हा सुरूवात झाली. प्रयोग सुरू होऊन काही मिनिटं झाली असतील, तर सेलफोन पुन्हा वाजला. काही कळायच्या आत, थिएटरमधला एक रसिक ताडकन जागेवरून उठला आणि ओरडला, 'अरे ए.. कुणाचा फोन आहे.. त्याला बाहेर काढा आधी..' हा प्रकार काही क्षणात घडला होता. पण नंतर लक्षात आलं, की मोबाइल वाजणं हा नाटकाचाच भाग होता. अनिकेतच्या खिशातला फोनच वाजला होता. हे लक्षात आल्यावर अनिकेत आणि अमृता दोघेही अक्षरश: फुटले! दोघांना हसू आवरेना.. अमृता तर हसत थेट विंगेत गेली. झाल्याप्रकाराने अख्ख्या थिएटरमध्ये हशा उसळला होता. पण काही क्षणांनी अमृता पुन्हा स्टेजवर आली आणि अतिशय समंजसरित्या या दोघांनीही पुन्हा प्रयोग सुरू केला. पुढे प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेलाच. पण, प्रयोग झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती या मोबाइल वाजण्याचीच.

First Published: Friday, September 23, 2011, 11:32


comments powered by Disqus