रौप्यमहोत्सवी 'अस्तित्व' - Marathi News 24taas.com

रौप्यमहोत्सवी 'अस्तित्व'

Tag:  
आदित्य निमकर, मुंबई
हौशी आणि नव्या दमाच्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ज्या स्पर्धा मुंबईत होतात, एक महत्त्वाची स्पर्धा म्हणजे 'कल्पना एक आविष्कार अनेक'. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यात नाट्यक्षेत्रातले दिग्गज एक संकल्पना सुचवतात आणि त्या भन्नाट संकल्पनेवर सादर केल्या जातात एक से बढकर एक एकांकिका...
 
रौप्यमहोत्सवी वर्षं असलेल्या या स्पर्धेत या वर्षी संकल्पना सुचवलेली होती ज्येष्ठ नाटककार, अभिनेते गिरीश कर्नाड यांनी. यावर्षी पारितोषिक पटकावलं ते रसिक, विलेपार्लेच्या ‘घर-बार’ने आणि अभिनय, कल्याणच्या ‘बॅलन्स शीट’ने. या स्पर्धेचं परीक्षण केलं ज्येष्ठ रंगकर्मी अरुण नलावडे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कमलाकर सोनटक्के आणि समीक्षक रविंद्र पाथरेंनी.
या स्पर्धेतून मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक दमदार कलाकारांनी उमेदीच्या काळात काम केलं आहे. नाटकांचा वापर नवे कलाकार पायरी म्हणून करतात अशी टीका होत असतानाच, यावर्षी सादर झालेल्या कलाविष्कारात नव्या दमाच्या कलाकारांबरोबर आज टीव्हीचा पडदा गाजणाऱ्य़ा कलाकारांनीही आवर्जून सहभाग घेतला.
 
एकंदरच यावर्षी सादर झालेल्या एकांकिका आपल्या कन्टेम्पररी विषयामुळे खूप हटके ठरल्या, आणि प्रेक्षकांना नाटकाची नवी जाणीव देऊन गेल्या...

First Published: Tuesday, October 11, 2011, 05:20


comments powered by Disqus