Last Updated: Monday, January 23, 2012, 12:08
www.24taas.com, सांगली

सांगलीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची सांगता झाली. संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे यांनी या संमेलनात इतिहास घडवला. मोघेंनी वा-यावरची वरात या नाटकात अभिनय केला.
नाट्य संमेलाच्या इतिहासात स्वतः अध्यक्षांनी अभिनय करण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा ठराव करण्यात आला. तसंच बेळगावच्या महापौरांवर कारवाई कऱणा-या कर्नाटक सरकारचा निषेध करण्याचा ठरावदेखील मांडण्यात आला.
First Published: Monday, January 23, 2012, 12:08