Last Updated: Tuesday, November 1, 2011, 15:30
झी २४ तास वेब टीम, मुंबईयंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. राम जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार देण्यात येतो. गेली ४६ वर्षे हा पुरस्कार ज्येष्ठ मान्यवरांना प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत हा मानाचा पदक पुरस्कार बालगंधर्व, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, ग.दि.माडगुळकर, हिराबाई बडोदेकर, डॉ श्रीराम लागू, निळू फुले आदी ज्येष्ठ कलावंतांना देण्यात आला आहे.
यंदाचा हा पुरस्कार रंगभूमी तसंच दूरदर्शनवरील सूत्रसंचालक, लेखक, दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे नाट्य आणि साहित्य क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे.
First Published: Tuesday, November 1, 2011, 15:30