'प्रेमात सगळं चालतं'... इंग्लंडमध्ये - Marathi News 24taas.com

'प्रेमात सगळं चालतं'... इंग्लंडमध्ये

www.24taas.com, मुंबई
 
‘प्रेमात सगळं चालतं’ या नाटकाची प्रेमाची नवी परीभाषा संजय नार्वेकर लवकरच रंगभूमीवर घेऊन येतोय. विजय केंकरे दिग्दर्शित प्रेमात सगळं चालतं या नाटकात संजय नार्वेकर प्रमुख भूमिका साकारतोय आणि सध्या याच नाटकाची रिहर्सलमध्ये संजय करतोय.
 
या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे नाटक युनायटेड किंगडमयेथील ‘कारडिफ द कॅपिटल सिटी ऑफ वॉल्स’ येथे होणार असल्यामुळे युरोपिअन मराठी सम्मेलन २०१२ मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. या नाटकात संजय नार्वेकरसह, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, प्राज्ञा शास्त्री प्रमुख भूमिका साकारत आहेत.
 
‘प्रेमात सगळं चालतं’ या नाटकाप्रमाणेच ‘वाह गुरू’ या नाटकाचं ओपनिंगही स्वित्झर्लंडमध्ये झालं होतं आणि त्यांनंतर त्याचे प्रयोग भारतात झाले. एकूणच सध्या परदेशात नाटकाचं ओपनिंग करण्याचा ट्रेण्ड दिसून येतोय. तसंच हे नाटक युरोपमध्ये होत असल्याने युरोपमधील नाट्यवेड्यारसिकांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे.

First Published: Saturday, March 31, 2012, 19:21


comments powered by Disqus