अमेरिकेला गुरू जाणार, शिष्य मात्र राहणार? - Marathi News 24taas.com

अमेरिकेला गुरू जाणार, शिष्य मात्र राहणार?

 www.24taas.com, मुंबई
 
व्वा! गुरू या गाजलेल्या नाटकाची टूर अमेरिकेला निघाली आहे. ९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत या नाटकाच्या दौरा होणार आहे. मात्र या नाटकात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अद्वैत दादरकरला व्हिसाच मिळालेला नाही. व्वा! गुरू.
 
मोटर न्युरॉन डिसीज हा जीवघेणा आजार झालेल्या प्राध्यापकाची आपल्या एका शिष्याशी भेट होते. त्याच्याबरोबर जुन्या आठवणीत रमता रमता प्राध्यापक त्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगतो. दिलीप प्रभावळकर आणि अद्वैत दादरकर यांनी व्वा! गुरू नाटकात गुरू-शिष्याचा भाववंध गहिरेपणाने साकारला आहे. या नाटकाला भारतातच नाही तर परदेशातही उदंड प्रतिसाद मिळाला.
 
स्वित्झर्लंडमध्ये या नाटकाचं ओपनिंग झालं. तिथे या नाटकाला मिळालेला प्रतिसाद पाहता आता हे नाटक अमेरिका दौरा कऱण्यासाठी सज्ज झालं आहे. या दौऱ्याबाबत दिलीप प्रभावळकर खूपच एक्साईटेड आहेत. या नाटकात अद्वैतची भूमिका आधी अतुल परचुरे साकारायचा.
 
मात्र अतुलनंतर अद्वैत य भूमिकेला योग्यरित्या न्याय देतो आहे असं असतानाच, आता या नाटकाच्या अमेरिकाच्या महत्वपूर्ण दौराला अद्वैत मुकणार असंच दिसतं आहे. कारण अमेरिकेच्या दौऱ्यासाठी अद्वैतला व्हिसाच मिळालेला नाही.  एकूणच रि-अप्लायमध्येही अद्वैतला जर व्हिसा मिळाला नाही तर अमेरिका दौऱ्यामध्ये अद्वैतची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता अमेरिकेतील नाट्यवेड्या रसिकांनाही लागून राहिली आहे.
 
 
 

First Published: Sunday, April 1, 2012, 22:31


comments powered by Disqus