'परपुरुषा'बरोबर नेहा पेंडसे लवकरच रंगभूमीवर - Marathi News 24taas.com

'परपुरुषा'बरोबर नेहा पेंडसे लवकरच रंगभूमीवर

www.24taas.com, मुंबई
 
अशोक समेळ लिखीत आणि दिग्दर्शित 'परपुरुष' हे नाटक येत्या २६ एप्रिलला रंगभूमीवर दाखल होतंय. नुकतीच या नाटकाची रिहर्सल पार पडली.
 
एकेकाळी रंगभूमी गाजवणा-या नाटककाराची पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सुरु असलेली धडपड, त्यातून निर्माण होणारा पेच, आणि गुंता ‘परपुरुष’ या नाटकातून मांडण्यात आलाय. अशोक समेळ लिखीत आणि दिग्दर्शित असलेलं गूढ, रहस्यमय असं हे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होतंय.
 
नेहा पेंडसे या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करतेय. नेहासह रमेश भाटकर आणि सुचित जाधवही या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. नाटकाचा गूढ विषय, अशोक समेळ आणि रमेश भाटकर यांची जुनी केमिस्ट्री आणि नेहा पेंडसेचं रंगभूमीवरील  पहिलं वहिलं पाऊल यासाठी का होईना हे नाटक पहायला हरकत नाही.

First Published: Tuesday, April 24, 2012, 20:00


comments powered by Disqus