'किडनॅप' नाटकाने उलगडलं मुलाचं विश्व - Marathi News 24taas.com

'किडनॅप' नाटकाने उलगडलं मुलाचं विश्व

www.24taas.com
 
कुमार सोहनी दिग्दर्शित किडनॅप नाटक नुकतच रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाचं वेगळेपण नेमकं कशात दडलंय हे देखील एक गू़ढच आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
 
अशात टीव्ही आणि इंटरनेटच्या युगात मुलांवर होणारे परीणाम किडनॅप या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शक कुमार सोहनी यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाल लिमये, नंदिनी वैद्य यांच्यासह बालकलाकार ओवी दीक्षितही या नाटकात प्रमुख भूमिका साकारते आहे.
 
तसंच तब्बल १६-१७ वर्षांनंतर अभिनेते सुहास पळशीकर पुन्हा एकदा रंगभूमीकडे वाटचाल करताना दिसत आहेत. या नाटकात त्यांची सुध्दा महत्वाची भूमिका आहे. एकूणच एक संवदेनशील विषय या नाटकातून मांडण्याचा केलेला प्रयत्न हा नक्कीच स्तुत्य आहे.
 
 
 
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 14:57


comments powered by Disqus