Last Updated: Sunday, March 24, 2013, 14:48
www.24taas.com,मुंबईअभिनेते विनय आपटे यांचा पराभव मोहन जोशी यांनी केला. जोशी यांची पुन्हा अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. वादामुळे या निवडणुकीकडे नाट्यप्रमींचे लक्ष लागले होते.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. फेरमतदान असो वा बनावट मतपत्रिका निवडणुकीचे महानाट्य चांगलेच रंगले.अखेर आज या निवडणूक नाट्याचा क्लायमॅक्स पाहायला मिळाला.
दरम्यान, नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड करण्यात आली. विनय आपटे यांचं नटराज पॅनेल आणि मोहन जोशींचं उस्फूर्त पॅनेल यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली होती. अखेर मोहन जोशींनी ही लढाई जिंकली. मोहन जोशी नाट्यपरिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
मोहन जोशी यांच्या उत्स्फूर्त पॅनलने बाजी मारली आहे. मोहन जोशी यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान पटकावला. अटीतटीच्या या निवडणुकीत जोशींच्या उत्स्फूर्त पॅनेलने व आपटेंच्या परिवर्तन पॅनेलने मुंबई विभागातून प्रत्येकी आठ मते मिळाली. त्यामुळे अध्यक्षपदी येण्यासाठी या दोघांची मदार महाराष्ट्राच्या विविध विभागांतील मतदारांवर होती. यात जोशी यांनी बाजी मारली.
माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात रविवारी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. त्यात नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी मोहन जोशी यांची निवड केली. मोहन जोशी यांना २७ मते मिळाली तर, विनय आपटे यांच्या पारड्यात १२ मते पडली. पडली. मोहन जोशी २००३-११ या काळात नाट्यपरिषदेचे अध्यक्ष होते. २०११ मध्ये एका वादामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
First Published: Sunday, March 24, 2013, 14:15