`नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा`च्या अध्यक्षपदी वामन केंद्रे Waman Kendre- New director of NSD

`नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा`च्या अध्यक्षपदी वामन केंद्रे

`नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा`च्या अध्यक्षपदी वामन केंद्रे
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

देशभरातल्या रंगकर्मींची पंढरी मानल्या गेलेल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदी सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांची निवड झालीय.

मुंबई विद्यापिठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् चेही ते प्रमुख आहेत. केंद्रे यांच्या रूपाने प्रथमच एक मराठी व्यक्ती एनएसडीच्या संचालकपदावर विराजमान झालीय. देशभरातून तब्बल 60 अर्ज आले होते. श्याम बेनेगल, गिरीश कर्नाड, सतीश आळेकर, गो. पु. देशपांडे आणि एनएसडीच्या अध्यक्ष अमल अलाना यांच्या समितीने नावांची छाननी केली.

त्यातून अरूंधती नाग, वामन केंद्रे, आणि अब्दुल लतीफ खटाना यांची नावं अंतिम यादीत होती. अखेर केंद्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 25, 2013, 17:21


comments powered by Disqus