शिवसेना कौनसे खेत की मुली है - आझमी - Marathi News 24taas.com

शिवसेना कौनसे खेत की मुली है - आझमी

www.24taas.com, अकोला
 
सपाचे आमदार अबू आझमी यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला 'टार्गेट' करत शिवसेनेवर चांगलीच टीका - टिप्पणी केलेली आहे. 'शिवसेना कौनसे खेत की मुली है' असं म्हणून अबू आझमी यांनी शिवसेनेला अगदीच तुच्छ लेखलं आहे.
 
शिवसेनेशी छत्तीसचा आकडा असलेल्या आमदार अबू आझमी यांनी निवडणूक प्रचारात पुन्हा एकदा सेनेला डिवचलं आहे. 'शिवसेना कौनसे खेत की मुली है', असा सवाल करतानात आपण शिवसेनेला घाबरत नसल्याचं समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
 
अकोला महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिवसेनेला जिवंत  ठेवणारी काँग्रेसच असल्याचा आरोपही आझमी यांनी यावेळी केला. इतकंच नाही तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उंचीवरही त्यांनी टिप्पणी केली. याच प्रचार सभेत भारिप-बहुजन महासंघाचे नगरसेवक मोहम्मद मुस्तफा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
 
 

First Published: Monday, January 23, 2012, 19:30


comments powered by Disqus