Last Updated: Tuesday, January 24, 2012, 14:38
www.24taas.com, चंद्रपूर 
चंद्रपूर इथं ३ ते ५ फेब्रुवारीला होणारे साहित्य संमेलनही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलं आहे. या संमेलनाला मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्यांना हजेरी लावण्यास राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मनाई केली आहे. आयोगानं आडकाठी केल्यामुळेच मुख्यमंत्र्यांना सांगलीच्या नाट्य संमेलनाला हजेरी लावता आली नव्हती.
नाट्य संमेलन तसेच मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकार अनुदान देते. त्यामुळं या संमेलनांच्या आयोजनात सरकारचाही सहभाग असतो. हे संमेलन काही अंशी सरकारचं ठरवते. सरकारी कार्यक्रमांना आचारसंहितेच्या काळात मंत्र्यांना उपस्थिती लावता येत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान सांगलीला झालेल्या नाट्यसंमेलनाला आयोगाच्या सूचनेवरुन मुख्यमंत्र्यांनी जाणे टाळले असताना गृहमंत्री आर. आर. पाटील आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी साधं आयोगाचं मतही विचारात घेतलं नाही.
त्याबद्दल सत्यनारायण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आर. आर. पाटील यांनी केलेल्या भाषणाबाबत खुलासा मागितला आहे. आचारसंहितेचा अतिरेक होत असल्याचं टीकास्त्र आर. आर.आबांनी सोडलं होतं.
First Published: Tuesday, January 24, 2012, 14:38