राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

www.24taas.com, पुणे
 
पुणे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय.
 
 
काल संध्याकाळी झी २४ तासनं प्रसिद्ध केलेल्या संभाव्य उमेदवारांची यादी खरी ठरवलीय. काल रात्री उशिरापर्यंत अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. या बैठकीत  पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुढील दोन तीन दिवसांत अंतिम यादी याहीर करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे महापौर योगेश बहल यांनी सांगितलं.
 
यादीत आहे कोण ?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन काल रात्री उशिरा ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली.  या यादीत योगेश बहल, मंगला कदम, सुमन पवळे, आर. एस. कुमार, अपर्णा डोके, विलास नांदगुडे, अजित गव्हाणे, नारायण बहिरवाडे, वसंत लोंढे, महेश लोंढे, जावेद शेख, सीमा फुगे, मोहिनी लांडे, तानाजी खाडे आणि शमीम पठाण आदींच्या नावांचा समावेश आहे.
 
यादीत आणखी कोण आहे, त्यासाठी व्हिडिओ पाहा.
 

 

First Published: Tuesday, February 7, 2012, 20:54


comments powered by Disqus