वस्त्र द्या, वस्त्रहरणाची भाषा नको - आबा - Marathi News 24taas.com

वस्त्र द्या, वस्त्रहरणाची भाषा नको - आबा

www.24taas.com, सांगली
 
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचं वस्त्रहरण करणार अशी घोषणा करताच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीदेखील नारायण राणे यांना उत्तर देत त्यांच्या वस्त्रहरणबाबत चांगलीच खिल्ली उडवली आहे.  इतरांना वस्त्र देण्याऐवजी उद्योगमंत्री नारायण राणे वस्त्रहरणाची भाषा का करतात असा सवाल गृहमंत्री आर आर पाटील यांनी उपस्थित केला आहे.
 
आर. आर. पाटील हे काल सांगलीत असताना बोलत होते. कोकणात राष्ट्रवादी विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेत राणे राष्ट्रवादीचं वस्त्रहरण करणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आर. आर. पाटील बोलत होते. नारायण राणे नेमकं काय करतात त्यानंतरच राष्ट्रवादी काय करायचं हे ठरवील अशी आव्हानात्मक भाषा आर. आर. पाटील यांनी वापरली आहे.
 
त्यामुळे आता नारायण राणे यांनी केलेली वस्त्रहरणाची घोषणा ते कशी अमंलात आणणर आहेत हे पाहणं नक्कीच औत्सुक्यांच ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता काय भुमिका घेणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published: Sunday, January 29, 2012, 19:32


comments powered by Disqus