Last Updated: Tuesday, February 7, 2012, 20:51
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या वैदुवस्ती प्रभागातून रामदास बोकड बिनविरोध निवडून आलेत.
मुकेश पवार, डॉ. संतोष सुपे, विष्णू शेळके, सतीश भांगरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं बोकड यांचा बिनविरोध विजय झाला. राष्ट्रवादीच्या शकुंतला धराडे यांचीही बिनविरोध निवड झाली. दोघेही विजयी उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादीला दोन जागा बिनविरोध मिळाल्या आहेत.
First Published: Tuesday, February 7, 2012, 20:51