Last Updated: Tuesday, February 7, 2012, 20:51
www.24taas.com, मुंबई 
मनपा निवडणुकांच्या प्रचाराचे धूमशान सुरु झालं आहे. मात्र राजकीय पक्षांमध्ये मुद्यांऐवजी गुद्याची लढाई सुरु झालीय. पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तसंच उपमहापौर डब्बू असनानी आणि काँग्रेस नगरसेवक अमर मूलचंदानी यांचे समर्थक भिडले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही बाजूकडून एकमेंकाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. या हाणामारीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं.
First Published: Tuesday, February 7, 2012, 20:51