Last Updated: Tuesday, February 7, 2012, 18:29
www.24taas.com, अकोला अकोल्यात संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला केलाय. तिकीट न मिळाल्याच्या निषेधार्थ शहराध्यक्ष संदिप पुंडकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. एबी फॉर्म देणार असल्याचं सांगत पक्षानं झुलवत ठेवल्याचा आरोप संतप्त कार्यकर्त्यांनी केला.
संदीप पुंडकर हे भारिप बहुजन महासंघाच्या इशा-यावर काम करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. निष्ठावंतांना डावलून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीटे देण्यात ल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. या घटनेनंतर संदीप पुंडकरांच्या निवासस्थानाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
First Published: Tuesday, February 7, 2012, 18:29