रवी राणाविरूद्ध आचार संहिता भंगाची तक्रार - Marathi News 24taas.com

रवी राणाविरूद्ध आचार संहिता भंगाची तक्रार

www.24taas.com, बडनेरा
 
मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदारांना लक्झरी बसनं तीर्थ यात्रेला पाठवून आचार संहिता भंग केल्याची तक्रार बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणांविरूध्द पोलिसांकडे करण्यात आली होती, त्यानुसार पोलिसांनी आठ ते दहा शेगावला जाणाऱ्या लक्झरी बसेसची चौकशीही केली.
 
मात्र या प्रवाशांचा टूर पूर्वनियोजीत असल्याचं सांगून रवीराणांनी तिथून काढता पाय घेतला. रवी राणा यांनी स्वाभिमान कॉंग्रेसच्या वतींनं उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळेच  मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रेचा घाट घातल्याचं बोललं जात आहे.
 
अमरावती पोलिसांनी मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील चौकशी करून रवीराणा दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता रवी राणा यांच्यावर कारवाई होणार का? याकडेचं सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
 
 

First Published: Tuesday, February 7, 2012, 22:13


comments powered by Disqus