Last Updated: Wednesday, February 8, 2012, 09:36
www.24taas.com, यवतमाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला, शिवसेना आमदार संजय राठोड यांनी लगावला आहे. मुलाला विजयी करण्यासाठी ते माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचंही राठोड यांनी म्हटलं.
मंगळवारी रात्री माणिकराव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती, ती दगडफेक संजय राठोड यांनी केली असल्याचा आरोप माणिकराव ठाकरेंनी केला होता. संजय राठोड यांच्याविरोधात नेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणिकराव ठाकरे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत रात्री उशीरापर्यंत सभा घेऊन, पैसे वाटत होते असा आरोपही संजय राठोड यांनी केला आहे.
First Published: Wednesday, February 8, 2012, 09:36