मुंबईचं शांघाय आता नागपूरचं सिंगापूर? - Marathi News 24taas.com

मुंबईचं शांघाय आता नागपूरचं सिंगापूर?

www.24taas.com, नागपूर
 
मुंबईला शांघाय करण्याचा गेले अनेक वर्ष विचार सरकार करत होतं, त्याप्रमाणे आता नागपूरला सिंगापूर करण्याचं काँग्रेसने जाहीर केले आहे. परंतु त्यामुळे पुन्हा एकदा वादगं निर्माण झाला आहे. यामुळेच नागपूरमध्ये काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात भाजप टीका केली जाते.
 
अनेक वर्ष सत्ता उपभोगून सुध्दा काँग्रेसला मुंबईचं शांघाय करता आलेलं नाही ते नागपूरचं सिंगापूर काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला विचारला आहे.
 
काँग्रेस निवडणूकीपूर्वी केवळ आश्वासन देऊन मत मिळवत  असल्याची टीका त्यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महायुतीचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला. गेल्या ५ वर्षात नागपूर महापालिकेत मोठ्या प्रमाणात काम केलीत त्या जोरावर मतदार महायुतीला विजयी करतील असा दावाही त्यांनी केला आहे.
 
 

First Published: Monday, February 13, 2012, 15:03


comments powered by Disqus