Last Updated: Monday, February 13, 2012, 18:37
www.24taas.com, अमरावती 
अमरावतीत सापडलेले पैसे यावरून बरेच रणकंदन माजले आहे, या सापडलेल्या पैश्यामुळे काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांना या वादात उडी घ्यावी लागली आहे. पण आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी देखील आता उडी घेतली आहे.
अमरावतीत जे पैसे सापडले ते कशासाठी होते, याचा तपास राष्ट्रवादीनं करावा, त्यांच्याकडे गृहखातंही आहे, असा टोला माणिकराव ठाकरेंनी लगावला आहे. राष्ट्रवादीनं याबाबत तक्रार करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर तो निवडणुकीसाठीचा निधी असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल एक कोटी रूपये हा पक्षनिधी असल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. पक्षाच्या उमेदवारांना हा पैसा देण्यात येणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलं. होतं
First Published: Monday, February 13, 2012, 18:37