रिकाम्या खुर्च्यांमुळे पवारांची सभा रद्द - Marathi News 24taas.com

रिकाम्या खुर्च्यांमुळे पवारांची सभा रद्द

www.24taas.com, पुणे
 
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच शरद पवारांची सभा रद्द झाली आहे. पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी सांगता सभा होणार होती. तशी घोषणाही करण्यात आली.
 
सभा दोन वाजता सुरु होणार होती. मात्र तीन वाजले तरी सभेच्या ठिकाणी कुणीही नव्हतं. साडेपाच वाजले तरी सभेच्या ठिकाणी अगदी तुरळक गर्दी होती. अखेर पाच वाजले आणि शरद पवार न येताच ही सभा संपली. पुन्हा एकहाती सत्ता मिळवण्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीला शेवटच्या दिवशी मात्र अशी नामुष्की सहन करावी लागली.
 
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू असनानी आणि काँग्रेस नगरसेवक अमर मूलचंदानी यांच्या समर्थकांत तुफान हाणामारी झाली होती. पिंपरी चिंचवडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच, सततच्या प्रचाराच्या धुमाकुळामुळे स्थानुक कंटाळून गेले आहेत. अशा वातावरणामुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला ही नामुष्की सहन करावी लगली असल्याचं बोललं जात आहे.

First Published: Wednesday, February 15, 2012, 10:38


comments powered by Disqus