Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:25
www.24taas.com, सोलापूर सोलापुरचे माजी महापौर आणि प्रभाग क्रमांक ११ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटेंना अटक करण्यात आली आहे. मतदाराने पैसे घेण्याचे नाकारल्याने मारहाण केल्याचा आरोप सपाटेंवर आहे. चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनोहर सपाटेंनी मारहाण केल्याचा इन्कार करत आपल्या विरोधात हे राजकीय ष़डयंत्र असल्याचं म्हटलं आहे.
First Published: Thursday, February 16, 2012, 13:25