Last Updated: Thursday, February 16, 2012, 15:04
www.24taas.com, अकोला अकोल्यातल्या हरिहरपेठ भागातल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. बुथ क्रमांक 305 वर ही दगडफेक करण्यात आली.
या घटनेनंतर गोंधळ उडाल्यामुळं या बुथवरचं मतदान काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. उमेदवारांच्या अंतर्गत स्पर्धेतून ही दगडफेक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या मतदान केंद्रांवर राज्य सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली.
दरम्यान सोलापुरचे माजी महापौर आणि प्रभाग क्रमांक ११ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटेंना अटक करण्यात आली आहे. मतदाराने पैसे घेण्याचे नाकारल्याने मारहाण केल्याचा आरोप सपाटेंवर आहे. चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनोहर सपाटेंनी मारहाण केल्याचा इन्कार करत आपल्या विरोधात हे राजकीय ष़डयंत्र असल्याचं म्हटलं आहे.
First Published: Thursday, February 16, 2012, 15:04