Last Updated: Friday, February 17, 2012, 07:01
www.24taas.com, मुंबई 
मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
www.24taas.com या आमच्या वेबसाईटवर तुम्हांला लाईव्ह महानगरपालिका आणि जिल्हापरिषदचे निकाल पाहता येईल.
तसंच आणखी अपडेट पाहण्यासाठी 'झी २४ तास'वर सर्वात आधी निकाल पहायला मिळणार आहे. दहा महापालिकांच्या १२४४ जागांचे निकाल आज लागणार आहेत. एकूण ९५३४ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. तर सर्वात जास्त उत्सुकता असलेल्या मुंबई महापालिकेत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मुंबईचा गड कोण राखणार, कोण ठरणार किंगमेकर याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे.
मुंबई महापालिकेसाठी २२३२ उमेदवार रिंगणात होते. २२७ जागांचा फैसला आज होणार आहे.ठाण्यात सकाळी ७:३० वाजता तर मुंबईत सकाळी ९:०० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आज सगळ्यांचेच लक्ष निकालाकडे लागून राहणार आहे.
First Published: Friday, February 17, 2012, 07:01