Last Updated: Saturday, February 18, 2012, 17:21
www.24taas.com, यवतमाळ यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या निवासस्थानी नाराज कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला.
शिवसेनेच्या पराभूत उमेदवार आणि जिल्हा महिला संघटक सागर, त्यांचे पती अशोक पुरी यांनी हा प्रकार केला. नेत्यांनी प्रचारात भाग घेतला नाही त्यामुळे पराभव स्वीकारावा लागल्याची तक्रार करत पुरी दाम्पत्य आणि त्यांच्या समर्थकांनी आमदार संजय राठोड आणि खासदार गवळी यांच्याशी वाद घातला.
गवळी यांच्या तक्रारीनंतर पुरी समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
First Published: Saturday, February 18, 2012, 17:21