Last Updated: Saturday, February 18, 2012, 20:49
www.24taas.com, उल्हासनगर उल्हासनगरमधल्या वॉर्ड क्रमांक २५मध्ये शिवसेनेच्या नगरसेविरका वसुधा बोडरे विजयी झाल्य़ाने संतापलेल्या पराभूत मनसे आणि अपक्ष उमेदवारानं शिवसेना शाखेत घुसून तोडफोड केली.
१०० ते १५० कार्यकर्ते अचानक शिवसेना शाखेत घुसले आणि त्यांनी शाखेतील साहित्यांची तोडफोड केली. तसंच शाखेवर दगडफेकही केली. यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या कार्यकत्यांनी काही काळ ठिय्या आंदोलन केलं. आंदोलनामुळे सुमारे दीड ते दोन तास रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
First Published: Saturday, February 18, 2012, 20:49