भास्कर जाधव यांचा निर्लज्जपणा - नीलेश राणे - Marathi News 24taas.com

भास्कर जाधव यांचा निर्लज्जपणा - नीलेश राणे

www.24taas.com, रत्नागिरी
 
नगरपालिका आणि त्यानंतर झेडपी निवडणुकीत राणे-जाधव वस्त्रहरण नाट्याचा आता निवडणूक निकालानंतरचा प्रयोग सुरू झाला आहे. सिंधुदुर्गच्या जनतेनं राष्ट्रवादीला स्वीकारलं मात्र रत्नागिरीतल्या जनतेनं बाहेरच्या लोकांना स्वीकारलं नाही असा टोला रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना लगावला आहे. तर जाधव यांचा हा निर्लज्जपणा असल्याची टीका खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.
 
भास्कर जाधव आणि नारायण राणे यांच्यातील वाद गेल्या काही महिन्यात अगदीच टोकाला गेला होता. त्यातून पक्ष कार्यालयाची तोडफोड यासारख्या घटना देखील घडल्या होत्या. मात्र त्यानंतर नगरपालिका निवडणूका यात राणेंना आलेले अपयश यासारख्या घटनामुळे कोकणात बरेच धुमशान सुरू होते.
 
मात्र महापालिका आणि झेडपी निवडणुकीच्या तोंडावर ह्या दोन नेंत्यांमधील वाद निवळला होता. असं वाटत असताना मात्र पुन्हा एकदा दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे पुन्हा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्यास सुरवात होणार हे मात्र नक्की.
 
 
 

First Published: Thursday, February 23, 2012, 10:25


comments powered by Disqus