शिवसेनेशिवाय भाजपने 'करून दाखवलं' - Marathi News 24taas.com

शिवसेनेशिवाय भाजपने 'करून दाखवलं'

www.24taas.com, नागपूर
 
नागपूरात परस्पर विरोधी विचारधारा असलेले राजकीय पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. भाजपप्रणीत नागपूर विकास आघाडीमध्ये इंडियन मुस्लीम लीगनं प्रवेश केला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला ६९ जागा मिळाल्या आहेत.
 
त्यात भाजपच्या ६३ तर शिवसेनेच्या ६ जागा आहेत. सत्तास्थापनेसाठी ७३ जागांची गरज असल्यानं आणखी चार जागा महायुतीला हव्या आहेत. दरम्यान भाजपनं शिवसेनेला डावलुन अपक्ष, इंडीयन मुस्लीम लीग, लोकभारती या पक्षांची मोट बांधत नागपूर विकास आघाडीची स्थापना केली. विकासाच्या मुद्यावर ही आघाडी तयार केली असल्याचा दावा भाजपकडून होतो आहे.
 
महाराष्ट्रात महायुती असताना नागपूरमध्ये मात्र शिवसेनेला हाताशी न घेता सत्ता स्थापनेसाठी भाजपने इंडियन मुस्लिम लीगला हाताशी घेत. शिवसेनाला सुद्धा जणू 'करून दाखवलं आहे'. त्यामुळे भाजपने नागपूरमध्ये आपली स्वत:ची वेगळी चूल मांडण्याचं ठरवलं आहे.

First Published: Saturday, February 25, 2012, 21:11


comments powered by Disqus