Last Updated: Tuesday, March 13, 2012, 17:32
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड 
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी मोहिनी लांडे यांचा विजय झाला आहे. मोहिनी लांडे यांनी शिवसेनेच्या शारदा बाबर यांचा पराभव केला आहे. मोहिनी लांडे यांना ९० मतं मिळाली आहेत तर शिवसेनेच्या शारदा बाबर यांना १५ मतं मिळाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ८३ नगरसेवक असून त्यांना ९ अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ ९२ वर गेलं. मात्र आज २ नगरसेवकांनी मतदानाला दांडी मारली. उर्वरित सर्वांचा राष्ट्रवादीला पाठींबा मिळाला.
या निवडणुकीत २१ नगरसेवक तटस्थ राहिले. महापौरपदासाठी राष्ट्रवादीने मोहिनी लांडे आणि उपमहापौरपदासाठी राजू मिसाळ यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेससह,भाजप आणि मनसे या तिन्ही पक्षांच्या २१ नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली.
First Published: Tuesday, March 13, 2012, 17:32